Thursday, June 15, 2017

लोहगड किल्ला

लोहगड किल्ला



लोहगड हा किल्ला लोणावळ्याजवळ आहे सदर किल्ला हा  समुद्र सपाटीपासून ३४२० फुट उंचीवर आहे भारत सरकरने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

तर चला जाणून घेयुयात आपण लोहगड बद्दल


                              


इतिहास : लोहगडावर सातवाहनचालुक्यराष्ट्रकूटयादव या सर्वांची राजवट राहिली आहे. सदर किल्ला हा अतिशय मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्यापासून जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी.
      इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली व स्थापनेनंतर  अनेक किल्ले जिंकले. लोहगड हा त्यापैकीच एक आहे.त्यानंतर इ.स. १६३० मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला. शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण व भिवंडी परिसर जिंकला व लोहगड–विसापूर का किल्लाही आपल्या ताभ्यात घेतला 
       त्यानंतर इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा  किल्ला परत जिंकला.
        पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्‍नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

पहाण्यासारखी ठिकाणे : 


१. गणेश दरवाजाः-  ह्या दरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाज्याच्या उजव्या व डाव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
२. नारायण दरवाजाः-  नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधला होता. दरवाज्याजवळ एक भुयार आहे या भुयाराचा वापर हा भात व नाचणी साठवून ठेवण्यासाठी करण्यात येत असे.
३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात जुना व प्राचीन दरवाजा आहे
४. महादरवाजाःहा गडाचा मुख्य दरवाजा असून या वरती हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्याही दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले होते. 

          दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. दर्ग्याच्या बाहेर बांधकामासाठी लागणारा  चुना बनविण्याची घाणी आहे.उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.धाज्स्थाम्बाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आहे.ध्वज्स्तंबा शेजारी काही शिवप्रेमींनी सिमेंटचा चौथरा बांधला असून त्या ठिकाणी तोफ आहे.दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे. तेथे एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आकाराचे आसुन. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आहे . नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे..मोठा तळ्याच्या पुढे  जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. गडावरून विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा भाग म्हणजे विंचूकाटा , लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचूकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . .या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा.  विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे.गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेणी आवर्जून पहावीत.
        
         लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फारच कमी गडावर पाहायला मिळते. लोहगडवाडी पार केली की ही सर्पाकार आकाराची वाट सुरू होते. एकदा का कोणीहि या वाटेने वर आला की मग तो माणूस वर येईपर्यंत पाहारेकर्‍यांच्या नजरेत राहत असे. तो व्यवस्थित हेरला जात असे . वाटेवर वेगवेगळे बुरूज आहेत. त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसावर नजर ठेवता येते. वाटेवर गणेश दरवाजा, दुसरा नारायण, तिसरा हनुमान आणि चौथा महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. हनुमान दरवाजा जुना आहे. इतर तीन दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतला आहे. 

गडावर कसे पोहचल 

१.पुण्याहुन अथवा मुंबईहुन येत असाल तर लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट आहे . वाट मोठी आणि प्रशस्त असून.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचले कि खिंडीच्या अलीकडेच लोहगडवाडी गाव आहे. खिंडीतून उजवीकडे वळल्यास  लोहगडास आणि डावीकडे वळल्यास विसापूर किल्ल्यावर पोहचतो.

२. स्वतःचे वाहन असल्यास दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. सदर रस्ता घाटाचा असून अत्यंत धोकादायक वळणे आहेत.

३.काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात. 

खाण्याची सोय: गडावरती आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होऊ शकते. 
पाण्याची सोय:  शिवमंदिरा पासून पुढे एक तले आहे तळ्याच्या बाजूला पाण्याचे टाके आहे गडावरती पाणी पिण्यासाठी हि एकमेव सोय आहे.

राहण्याची सोय: गडावरती लक्ष्मी कोठी आहे. येथे रहाण्याची एकमेव सोय आहे. ३५ ते ४० जण येथे आरामात राहू शकतात




सिंहगड किल्ला


सिंहगड किल्ला






        पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो.. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.


अल्प परिचय

नावसिंहगड
उंची४४००मी.
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणपुणे जिल्हा,
जवळचे गावसिंहगड

इतिहास

याचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता.

सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.
मार्ग 
स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.
स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.


पाहण्यासारखी ठिकाणे
दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उद्‌ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
श्री अमृतेश्वर भैरव मंदिर' : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.
कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.
उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.
राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्याा राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्च इ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.
तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

खाण्याची सोय: गडावरती अनेक छोटी-छोटो हॉटेल्स आहेत. 
पाण्याची सोय : गडावरती देवटाक्यांमधील पाणी पिण्यासाठी योग्य आहे.
राहण्याची सोय :    गडावरती राहण्याची सोय नाही.

Wednesday, June 14, 2017

तिकोना किल्ला Tikona Fort

                         

तिकोना किल्ला

Tikona Fort

पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्लासमुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. तुंग किल्ला ३-४ कि.मी अंतरावर दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले.

तर चला जाणून घेऊयात या किल्ल्या बाबत 

अल्प परिचय

नावतिकोना (वितंडगड)
उंची११०० मी.
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणपुणे जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गावतिकोना पेठ
डोंगररांग-
सध्याची अवस्थाचांगली

इतिहास

तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत अ त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा टंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहातशिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. नेताजी पालकर कडे काही दिवस किल्ल्याची जबाबदारी होती.


गडावर जाण्याच्या वाटा



तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरुन थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात.
मार्ग 
पुणे - कोळवण बस घेउन गडाच्या पायथ्या्च्या थोडे जवळ जाता येते किंवा कामशेतहून
काळे कॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते.
1.
  • ब्राम्हणोली मार्गे : अनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असा ट्रेकही करतात. यासाठी तुंग किल्ला पाहून तुंगवाडीत उतरावे आणि केवरे या गावी यावे येथून लॉंचने पलिकडच्या तीरावरील ब्राम्हणोली या गावी यावे. ब्राम्हणोली ते तिकोनापेठ हे अंतर ३० मिनिटांचे आहे.
  • तिकोनापेठ मार्गे : गडावर जाणाई मुख्य वाट ही तिकोनापेठ या गावातून जाते. यासाठी लोणावळ्याच्या दोन स्टेशन पुढच्या कामशेत स्टेशनावर उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी अशी बस सेवा अथवा जीपसेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ अशी देखील जीपसेवा उपलब्ध आहे. या बसने किंवा जीपने तिकोनापेठ गावं गाठावे. कामशेत पासून सकाळी ८.३० ला सुटणारी पॉंड बस पकडून तिकोनापेठ या गावी उतरावे. तसेच कामशेत ते मोर्सेबस पकडूनही तिकोनापेठला उतरता येते. तिकोनापेठतून ४५ मिनिटात आपण किल्ल्यावर पोहचतो. वाट फार दमछाक करणारी नसून अत्यंत सोपी व सरळ आहे. किल्ल्यावरील दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक वाट जाते. या वाटेने २० मिनिटांतच बालेकिल्ला गाठता येतो.
  • बेडसे लेण्यामार्गे : अनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर, बेडसे लेणे आणि तिकोना ा ट्रेकही करतात. यासाठी बेडसे लेण्या करुन तिकोनापेठेत जाता येते.


पाहण्यासारखी ठिकाणे
गडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळि व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे. वरच्या बाजुस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत.

खाण्याची सोय : जेवणाची सोय आपण स्वतः करावी
.पाण्याची सोय : गडावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाके आहेत. 

राहण्याची सोय : राहण्याची कोणतेही सोय नाही



शिवनेरी किल्ला Shivneri killa



शिवनेरी किल्ला




शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे.महाराष्ट्राचे दैवत राजे श्री शिवछत्रपती महाराज  यांचे जन्मस्थान. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. 

तर चला जाणून घेऊयात या किल्ल्या बाबत 

शिवनेरी अल्प परिचय

नावशिवनेरी
उंची३५०० फूट
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणपुणे जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गावजुन्नर
डोंगररांगनाणेघाट
सध्याची अवस्थासर्वात चांगली

      शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर येथे आहे. पुणे शहर पासून अंदाजे १०५ किलोमीटर वरती  हा किल्ला आहे.भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
       १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर  जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
      शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
    

इतिहास

          जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.
          सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.
          यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाईस जिजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न शिवाजीने केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.

गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.
  • साखळीची वाट :
या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवाजीच्या पुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणार्‍या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.
  • सात दरवाज्यांची वाट :
शिवाजीच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

पाहण्यासारखी ठिकाणे
          शिवजन्मस्थान,जिजाऊ व बाल शिवाजी यांचा पुतळा, गंगा टाकी, जमुना टाकी, शिवाई मंदीर, दरवाजे, अंबरखाना, बदामी टाक इ पाहण्यासारखे आहे. 

पाण्याची सोय
          
          गंगा जमुना टाक्यांमध्ये 12 माही पिण्याचे पाणी उपलब्ध



पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला सह्याद्रीच्या  दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर  सिंहगड...